Saturday, 12 December 2015

Letter to Narendra modi by poor employee 2016 in marathi

एका कामगाराचे नरेंद्र मोदी यांना पत्र

आदरणीय  पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांस,

तुम्ही सरकारी कर्मचारी यांना 7 वा वेतन आयोग लागू केला त्याचनियमानुसार  औद्योगिक मध्यम उद्योगांतील कामगारांचे पण किमान वेतन वाढायला पाहिजे।
कारण, देशाच्या विकासात कामगारांचा पण मोठा वाटा आहे हे सर्वांनाच माहित आहे. तुम्ही कामगार कायदया मध्ये बदल करत आहात. पण स्वातंत्र्य मिळाल्या पासुन 60 % उद्योगपती किमान वेतन देत नाहीत. आणि कामगार कायदयाची अंमल बजावणीही करत नाहीत. ज्या उद्योगपतींनीे कामगार कायदयाची अंमलबजावनी केली नाही. त्या उद्योगपतींना कामगार कायदया नुसार शिक्षा झालीच पाहिजे होती, ती आज पर्यंत झाली नाही. हि वस्तुस्थिती आहे.

तुम्ही उद्योगपतींना आर्थिक मदत करतात शेतक-याला कर्ज माफी देतात.
पण, आज पर्यंत कामगारांना सरकारने कोणतीच मदत केली नाही. हे वास्तव आहे. ज्या वेळेला उद्योगपती अचानक कंपनी टाळेबंदी करतो, कामगारांची देणी देत नाहीत. मग हे प्रकरण न्यायालयात जाते. न्यायालयाचा निकायेई पर्यंत कामगार पुर्ण खचुन जातो. त्याचे संपुर्ण आयुष्य बरबाद होते तो कर्ज बाजारी होतो. तेव्हां त्याचा परीणाम कामगरांच्या जीवनावर काय होतो. हे सर्व कामगारांनाच माहित.
हयाचा विचार कोणीच करत नाही.
घराचे हफ्ते,मुलांचा शिक्षणाचा खर्च, वीज बील, किराणा, दुध, इ. हे जीवनावश्यक वस्तु सुद्धा तो त्या वेळेला विकत घेऊ शकत नाही.
पण, याचा परीणाम येत्या काही दिवसांनी दिसेल कामगार सुद्धा आत्महत्या करतील ज्या प्रमाणे आज शेतकरी करतो आहे. उद्योगपती 25 लाखाच्या गाडीत फिरतो. पण कष्ट करना-या कमगारांना त्यांचा योग्य मोबदला देत नाही.

एकीकडे सरकारी कर्मचारी, वकील, व्यापारी, कारखानदार मालक, खासदार, आमदार, डॉक्टर, न्यायाधीश हे सर्व महागाई च्या हिशोबाने आपले उत्पन्न वाढवत जातात. मग कामगरांचे का वाढायला नको. ही विसंगति एकाच देशामध्ये कशी होऊ शकते?
आणि आर्थिक विषमता जर जास्त वाढली तर त्याचे परीणाम काय होतील, हयाचा विचार कोणीच करत नाही.
पण सरकारने याचा विचार  करायला पाहिजे.

कारण, जर सरकारने लक्ष दिले नाही तर, देशामध्ये गुन्हेगारी वाढत जाईल. आतंकवादाकडे तरूण मुलं आकर्षित होतील. आपण त्यांना कितीजरी समजुन सांगीतले तरी त्याचा परीणाम काहीच होणार नाही.
कारण, एकीकडे आपण 25 लाखाच्या गाडीत फिरायचे, बदाम, काजु, खायचे. नोकर चाकर वापरायचे, एसी रूम मध्ये झोपायचे आणि, वरून सांगायचे माझ्या नशिबात होते म्हणून  मला मिळाले.
अरे वाह असे सांगताना लाज नाही वाटली का आपल्याला.
कारण, या देशाच्या संपत्तिवर फक्त श्रीमंतांचा आणि राजकारणयाचा, बुद्धिजीवींचाच अधिकार नाही. तो श्रमजीवींचा आणि गरीबीतला गरीब या देशात जन्मलेल्या माणसाचा अधिकार आहे. नशिब म्हणुन नका सांगु आम्हाला.

कामगार कष्ट करून घाम गाळतो. तेव्हां उद्योगपती ने गुंतवणुक केलेले 5 लाखाचे 50 लाख होतात. आणि उद्योगपती करोड़पति बनतो. हे सर्व काही नशिबाने नाही झाले. जर तुला तुझ्या नशिबावर येवढा विश्वास होता? तर ते 5 लाख तीजोरीत ठेव, त्याचे 50 लाख होतात का ते पाहा.
जे उद्योगपति किंवा इतर कोणी असे सांगत असतील तर त्यांच्या पेक्षा इंग्रज बरे असे म्हणायची वेळ येते.

नरेंद्र मोदी साहेब तुमच्याकडून तमाम कामगार वर्गाच्या खुप अपेक्षा  आहेत तुम्ही कामगारांचे कंबरडे मोडून ऊद्योगपतींचे भले करणार असाल तर  सबका साथ सबका विकास हा होऊच शकत नाही तरी कामगारांचा  प्राधान्याने विचार करावा ही विनंती

कामगार मित्रानों हाथ जोडुन विनंती हे करतो की जास्तीत जास्त ग्रूप मध्ये हा मेसेज पाठवा कारण सत्य परिस्थिति समोर यायला पाहिजे बदल हा झालाच पाहिजे.
सब का साथ सब का विकास हा पाहिजेच.
                 
          आपला विश्वासू देशभक्त
एक कामगार������

No comments:

Post a Comment