गुरुवर्य....
आदरणीय श्री संभाजीराव भीडे गुरुजी
आज राहवलं नाही... अन् क्षणांत लिहायला घेतलं..... . . .
ना पैशाचा मोह... ना सत्तेची नशा !
या जगातील सर्वात मोठी संपत्ती काय असू शकते तर ती म्हणजे आयुष्यात जोडलेली माणसं...
जीवाला जीव देणारी माणसं...
प्रत्येक परिस्थितीत शिस्त, आदर, संस्कार, संस्कृती, योग्यता टीकवुन ठेवणारी प्रामाणिक माणसं...
दिला शब्द खाली न पडू देता त्याचे तळहाताच्या फोडाप्रमाणे जतन करणारी माणसं...
वय वर्षे ८४
Msc.Physics Gold Medallist
( पुणे विद्यापीठ )
करोड़ों रुपये दर महीना कमाऊ शकले असते, परंतु ध्येयवेड फक्त माणुसकी कमवण्याचे !
आजही हिंदुस्थानातुन गुरुजींच्या फक्त एका शब्दांवर लाखों धारकरी जमा होतात....
हीच आहे गुरुजींच्या आयुष्यातील सर्वांत मोठी कमाई !
या मातृभूमीला पादत्राणांचा स्पर्श होऊ नये म्हणुन आख्खं आयुष्य विना चप्पल ( अनवाणी ) चालतात...
किती होत असेल त्रास अन् किती होत असतील यातना...
चेहर्यावरुन कधीही दिसुन येणार नाहीत त्यांच्या मनातील जखमा !
पुर्या ३० वर्षांपासुन हिंदू धर्मासाठी अखंड रात्रंदिवस कार्यरत असलेले व्यक्तिमत्वं.
अप्रतिम वर्णन....
पानीदार डोळे... चेहर्यावरील तेज... दाट मिशी... डोक्यावर पांढरी टोपी अन् सर्वसामान्य पोशाख !
आजच्या तरुणांना लाजवेल असे महान कार्य !
या हिंदूस्थानात "शिवाजी-संभाजी" रक्तगटाचा समाज तयार व्हावा म्हणुन
एकच ध्येय काळजात कोरुन एक एक क्षण विना विलंब खर्च करतात...
डोळे भरुन येतात लिहताना...
वृद्धावस्थेत किती यातनां सोसाव्या लागतात हे आपल्या आजोबांच्या शारिरीक स्थितीवरुनच कळते,
पण गुरुजींचे वृद्धावस्थेतही पाहताच एखादा तरुण मान खाली घालुन चरण स्पर्श करेल असे रुप, अशी शारीरिक परिस्थिती अन् मानसिक सुस्थिती पहायला मिळते.
देव, देश अन् धर्मासाठी एवढ्या सुंदर आयुष्याचा सर्वस्व त्याग करणे यापेक्षा महान पुण्य काय असु शकते... बोला दुसरे काय असु शकेल असे पुण्य !
हिंदू एकता निर्माण करण्यासाठी जीवाचे रान करुन धडपडतात.
गुरुजींचा एकच महामंत्र सर्वांसाठी प्रेरणादायी आहे... तो म्हणजे "शिवाजी-संभाजी" रक्तगट समाज तयार झाला पाहिजे बस्स !
आजच्या तरुणांसाठी एक अनोखा आदर्श आणि प्रेरणादायी व्यक्तिमत्वं म्हणजे आदरणीय श्री भीडे गुरुजी !
ज्यांना देव भेटला ते संत झाले...
ज्यांना गुरुजी भेटले ते भाग्यवंत झाले !
गुरुजी... शब्द अपुरे पडतात तुमच्यासाठी अजुन काय लिहू...
आई भवानी मातेच्या आशीर्वादाने हे हिंदूत्वं स्वप्न सत्यरुपी प्रकट होवो ही शिवचरणी प्रार्थना !!!
॥ जयतु हिंदू राष्ट्रम् ॥
॥ जय भवानी जय जिजाऊ ॥
॥ जय शिवराय जय शंभुराजे ॥
॥ राष्ट्रांत निर्मू अवघ्या शिवसुर्यजाळ ॥
॥ श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान ॥
जगदंब... जगदंब...!!
- शब्दांकन :
( श्री शिवप्रतिष्ठान धारकरी)
No comments:
Post a Comment