अरे ओळखलेत का मला ?
नाही ना ?
अहो मी आहे रवींद्र पाटील . पाटलाचे पोर .
शिवरायांचे रक्त अंगात असलेला मी होतो एक
मुंबई पोलीस . प्राण जाय पर वचन न जाय हा
माझा असली बाणा . मरेस्तोवर जपला मी .
लाखो, करोडो रुपयांचे आमिष झुगारून मी ठाम
राहिलो अखेरपर्यंत .
सलमान खानच्या लँड क्रूझरने २८ सप्टेंबर २००२ या
दिवशी पाच जणांना चिरडले तेव्हा या घटनेची
तक्रार नोंदवली होती सलमानचा अंगरक्षक
असलेल्या मीच पोलिस कॉन्स्टेबल रवींद्र पाटील..
हो तोच तो मी रवींद्र ! एक पोलिस आणि
नागरिक म्हणून आपले कर्तव्य पार पाडलेल्या
माझ्यावर मात्र साक्ष फिरवण्यासाठी
कमालीचा दबाव आला,
नोकरीही गमवावी लागली. बेरोजगार
झाल्यानंतर घरातून बाहेर पडावे लागले. मी माझा
आयुष्यातील अखेरचा काळ रस्त्यावर अक्षरशः
भीक मागून काढला आणि टीबीने खंगून मी
आपला जीव सोडला . .
१९९८च्या सुमारास अंडरवर्ल्डकडून धमकी आल्याने
अभिनेता सलमान खान याला मुंबई पोलिसांकडून
संरक्षण पुरविण्यात आले.
कॉन्स्टेबल म्हणून मला सलमानच्या संरक्षणासाठी
तैनात करण्यात आले. २८ सप्टेंबरच्या रात्री मी
सलमानसोबत होतो . सलमान मद्यधुंद अवस्थेत
असताना मी त्याला गाडी न चालवण्याचा
सल्ला दिला. परंतु, सलमानने तो धुडकावून भरधाव
वेगात गाडी चालवण्यास सुरुवात केली.
अखेर वांद्र्यातील अमेरिकन एक्स्प्रेस बेकरीवर
जाऊन सलमानची लँड क्रूझर आदळली. या
अपघातात एक ठार आणि चार जखमी झाले. या
अपघाताची माहिती मीच वांद्रे पोलिस
स्टेशनमध्ये दिली. त्यावरूनच एफआयआर
नोंदविण्यात आला. मीच सुनावणी दरम्यान
सलमान गाडी चालवत असल्याची साक्ष
दिली.त्यानंतर या हाय-प्रोफाईल प्रकरणात
साक्ष देण्याचे परिणाम मला भोगावे लागले.
२००६ मध्ये मी अचानक मला 'बेपत्ता' करण्यात
आले . माझे एकाएकी गायब होणे सर्वांनाच
चक्रावणारे होते. सुनावणीदरम्यान सतत गैरहजर
राहिल्याचा ठपका ठेवत कोर्टाने मला अटक
करण्याचे आदेश दिले. त्यानुसार, क्राइम ब्रँचने
मार्च २००६ रोजी मला महाबळेश्वर येथून अटक केले.
माझी रवानगी आर्थर रोड जेलमध्ये करण्यात
आली. मला पोलिस दलातून बडतर्फ करण्यात आले.
तुरुंगातून सुटका झाल्यानंतर माझ्या डोक्यावर
छप्परही राहिले नाही. एकेकाळी कर्तव्यदक्ष
म्हणून गौरव झालेला मी पाटील २००७ मध्ये
शिवडीतील रस्त्यावर भीक मागताना आढळलो .
एकेकाळी पिळदार शरीरयष्टी असलेला मी ड्रग
रेझिस्टंट टीबीने खंगलो होतो . अखेरच्या
दिवसांतही मी मित्रांना आपण साक्षीवर ठाम
असल्याचे सांगत होतो . अखेर ३ ऑक्टोबर २००७
रोजी शिवडीच्या टीबी हॉस्पिटलमध्ये माझा
मृत्यू झाला. सुपरस्टारला गजाआड पाठवण्याइतके
महत्त्व असलेल्या साक्षीवर ठाम राहण्याची
किंमत मला मोजावी लागली.
माणसांच्या आत एक सैतान दडलेला असतो . हे मी
प्रत्यक्ष पाहिले आहे. भावनेपेक्षा कर्तव्य नेहमीच
मोठे असते . दुर्दैवाने जिवंत असताना माझ्या
लढाईला यश आले नाही . मी मेल्यानंतरही न्याय
मिळाला नाही ..
असो, पुढचा जन्म मिळाला तर नक्कीच पुन्हा
रवींद्र पाटील होईन आणि माजलेल्या अनेक
सलमानला गजाआड करीन .
चला ,विचार करा .
निरोप घेतो तुमचाच
रविंद्र पाटील(मृत )
.
लेखक- अनामिक

Latest Breaking News Hindi Live, Daily Headlines from India current affairs, cricket, sports, business TV Hindi News NonStop News Superfast instant News now – Watch live & funny Videos Watch movies broadcasting All Channels here- Best Hindi English News www.watchnext.in Bollywood News http://breaking-news-live-watchnext.blogspot.in/ http://breaking-news-live.watchnext.in/ audition-casting-india.blogspot.com
Saturday, 12 December 2015
अरे ओळखलेत का मला ? नाही ना ?
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment