अरे..तु घेत नाहीस? असे कसे चालेल यार ..अजुन काय दुध
पितोस ? "
" बंदर क्या जाने अद्रक का स्वाद ..हा हा बच्चा है अभीतक
..देख बेटा ऐसे रहेगा तो तरक्की कैसे होगी?
" नको रे बाबा ..माझ्या घरी असले काही चालत नाही..अन
तुम्हाला दारूचे दुष्परिणाम माहीत नाहीत का ..किती लोक
उध्वस्त होतात.."
" ओह म्हंजे कुक्कुलं बाळ आहे तु..घरच्या लोकांना घाबरतोस
..हा हा ग्रेट जोक..पहा रे हा इंजिनिअर ..घरच्यांना
घाबरतो..अरे त्यांना कळेल असे प्यायचे नाही रे बाळा..अन
आपण काही हलकी देशी दारु नाही पिणार..ते बरबाद होणारे
लोक देशी पितात..आणि रोज नाही रे ..फक्त कधी कधी
पार्टी असली की घ्यायची ..चल चल नाटक नको करुस
घे थोडी.."
" देशी असो की इंग्लीश..बियर असो की जिन..की
वाईन..दारु ती दारूच्या..अन थोडी थोडी घेतच सुरवात
होते..पुढे वाढत जाते..हे मला माहीत आहे..तुम्हाला जे करायचे
ते करा.मला आग्रह करु नका.."
" देख अपने दोस्ती का वास्ता है तेरेकॊ..तु जर घेत नसशील तर
आजचे बील तुला द्यावे लागेल.."
तुमचे दारूचे बिल पण देणार नाही ..अन अशी दारूचा आग्रह
करणारी दोस्ती मी मानत नाही.
जातो मी ..बसा तुम्ही ..करा मजा."
" ए जावु द्या रे..नका त्याच्या मागे लागू..ठिक आहे बाबा तु घे
फ्रुट ज्युस "
दारु प्यायला अक्कल लागत नाही तर ती कुणाकडून पण
नाकारायला धैर्य लागते हे दाखवुन दिलेत
रोज नारळ पाणी प्यायची सवय लाऊन घ्या , मग समजेल आपण
सर्वात महागडे अगदी दारू पेक्षा महागडे पेय पीत आहोत.
No comments:
Post a Comment