Thursday, 27 August 2015

Inspiration source




वृद्ध कोल्हा महाराज, विशाल जबडा हालवीत 

मनसोक्त हसायचा प्रयत्न करू लागले. 

समोर उभा ठाकलेला कोल्हु सेनापती, 
महाराज आपल्या समाज-तोडण्याच्या करामतींनी खुष झालेले पाहून 
हरखून गेला. 
त्याच्या डोईवरचे शिल्लक कुरळे केस माजात थरारले. 
बघता बघता ठीक ठिकाणाचे शागीर्द आपल्या 'हरीण-विरोधी' 
विषारी हरकतींचे भेसूर वर्णन करू लागले. 
कोल्हा महाराज मजेत कान देवून ऐकत राहिले. 
आपल्या लबाड कारकिर्दीचे खरे ईप्सित परत एकवार साध्य होत असल्याचे पाहून त्यांना आंतरिक गुदगुल्या होत होत्या !
हा असा सगळा आनंद सोहळा सुरु असताना 
कोल्हा महाराज अचानक सावध झाले. 
दूर, जंगलाच्या पठारावरून , वृक्षांच्या गर्दीतून सावध, प्रयत्नपूर्वक वाट काढीत हरीणांचे कळप दौडत पुढे जात होते. 
त्यांच्या एकसंध , चिवट प्रयत्नांच्या ताकदीचे आणि सच्चेपणाचे तेज 
भोवती वलय बनून हालत होते.......
काळवंडल्या चेहेर्याने कोल्हा महाराजाने नजर फिरवून समोर पाहिले. 
परंतु ,असुयेचे अंगार ओकणाऱ्या डोळ्यांनी हरीणांच्या कळपाकडे पाहणारे प्रमुख कोल्हा-सरदार पाहून त्यांना लगेच बरे वाटले. 
क्षणभर खिन्न झालेले मन परत खुलले. 
आता नेहेमीच्या सराईत मुत्सुद्दीपणे कोल्हा महाराज 
पुढच्या योजना आखू लागले. 
अल्पसंख्य , तेजस्वी हरीणांचे खच्चीकरण ! 
एकच ध्येय . सध्यातरी . 
कारकीर्दीच्या उतरत्या काळात आणि कळेत रक्तरंजित, विघातक का होईना 
पण ठसा उमटविण्याचा एक प्रयत्न. 
जंगलच्या इतिहासकारांच्या 'कोल्हा महाराजांची कारकीर्द' प्रकरणात 
आणखी एक काळे पान. 
एवढ्या बलाढ्य प्राणी-राजाच्या शिरपेचात,
एकही विधायक कामाचे सुवर्णपंख नसावे याची कोणाला खंत ना खेद ! चालायचेच. कमनशीब. 
असो. 
मगाशी गेलेल्या हरीणांच्या कळपातल्या मित्रांबरोबर खेळायला आणि 
चार शहाणपणाच्या गोष्टी शेअर करायला अधीर झालेले बरेचसे कोल्हा सैनिक, महाराजांची आणि त्यांच्या खास शिलेदारांची नजर चुकवून मागच्या मागे पसार झाले...........
द्वेषाच्या धुंद कैफात मश्गुल झालेल्या धूर्त आणि मुत्सुद्दी कोल्हा महाराजांच्या नजरेतून हे सुटले नाही. पण त्यांनी तसे दाखवले नाही. 
त्यांच्या मनाचा गाभा कधीच कुणाला कळला नाही. खुद्द त्यांनाही

No comments:

Post a Comment