Thursday, 27 August 2015

Love Vs Arrange Marriage


 लव्ह म्यारेज किंवा अरेंज्ड म्यारेज, काही का असेना.........ते टिकवणं
हे जास्त महत्वाचं असतं असं माझं मत आहे.....एका जोडीच्या अनुभवाच्या फुटपट्टीवर (सासू-सासरे अथवा मुलीचे आई-वडील..तसंच इतर नातेवाईक) नवपरिणीत जोडप्याला सगळेच्या सगळे रुल्स लागू पडत नाहीत...there is no best known method .....प्रत्येक केस युनिक असते.....
माझ्या एका मित्राच्या मुलीनी मला फार पूर्वी विचारलं होता की "रंगा काका तू असं का म्हणतोस की लग्न ठरवलंस तर शक्यतो स्वधर्मी, स्वजातीय मुलाशी ठरव?.. आणि आपल्याकडे अरेंज्ड म्यारेज करताना सहसा स्वजातीय, स्वधर्मीय अशीच स्थळं का बघतात?....... इतर लोक वाईट असतात का?”
मी तिला असं उत्तर दिलं होतं......
"माणसं वाईट नसतात पण माणसांच्या सवयी नक्की ‘वेगवेगळ्या’ असतात. आपण जेंव्हा ट्रेकला
जातो, किंवा ट्रीपला जातो, तेंव्हा आपल्या बरोबर असलेले लोक हे दरवेळेस आपल्या चॉइसचेच असतात असं नाही. अनेक जाती धर्माचे अनोळखी लोक असतात. त्यांच्या बरोबर आपण तो ट्रेक किंवा ट्रीप अनुभवत असतो, तेंव्हा त्यांच्या काही सवयी आपल्याला जाणवतात. काही खटकतात पण आपण काही वेळ त्या सहन करतो, adjust करतो. कारण आपल्याला माहिती असतं, की हा ट्रेक किंवा ट्रीप थोड्या दिवसांची आहे. तसंच एखाद्या सवयीचा, फारच त्रास होत असेल तर आपण ग्रुप बदलतो, रूम \ हॉल बदलतो वगैरे. लग्न म्हणजे ट्रीपला जाणं नाही, उभ्या आयुष्याचा सवाल असतो…..प्रचंड वेगळ्या सवयी असलेला माणूस तुला 24x7 आयुष्यभर जोडीदार म्हणून चालेल का? असा विचार तू करून बघ आणि "त्याच्यापेक्षा भिन्न सवयी असलेली तू, त्याला बायको म्हणून आणि त्याच्या घरी सून म्हणून कायमची चालशील का?" ह्याचं उत्तर त्यांनी द्यायचंय, तू नाही.
आर्थिक स्तर जर का सारखाच आहे असं गृहीत धरलं तर, एका धर्मात किंवा एका जातीत असलेल्या कुटुंबांच्या घरातल्या जगण्या वागण्याच्या दैनंदिन चालीरीती ह्या बर्यापैकी सारख्या असतात आणि त्या प्रथा, परम्परेनी, संस्कारांनी आलेल्या असतात. काही चालीरीती, सवयी ह्या विशिष्ट घराण्यातल्या चालीरीती, कर्मकांड यानुसार असू शकतात. घरा-घराप्रमाणे त्या वेगळ्या असतात आणि उरलेल्या सवयी ह्या वैयक्तिक (व्यक्तीसापेक्ष) असतात. ह्यातल्या कोणत्याही जाती-धर्माच्या सवयींना मी 'वाईट' असं टयाग करत नाही, पण 'वेगळ्या' मात्र नक्कीच म्हणून शकीन.
अरेंज्ड म्यारेजमधे शक्यतो स्वधर्मीय, स्वजातीय स्थळं बघतात कारण आपल्या मुलीला कमीत कमी adjustments करायला लागव्यात हा आई-वडिलांचा हेतू असू शकतो. जर त्याच धर्मात पण पोट जातीत, उपजातीत लग्न केलं तर adjustment चं प्रमाण थोडं वाढेल, पण जर पूर्णपणे वेगळ्याच जाती-धर्माच्या मुलाशी लग्न केलं तर मुलीला (आणि मुलाच्या घरच्यांनासुद्धा) खूप मोठ्या प्रमाणत adjustments करायला लागायची शक्यता असते. सर्व गोष्टीना अपवाद असतात; मी अपवादात्मक उदाहरणान्बद्दल बोलत नाहीये, किंबहुना तिथे बोलायला वावच नसतो. जर adjustments करता आल्या नाहीत तर लग्नानंतर एक तर भांडून वेगळं रहावं लागेल किंवा साथीदार बदलावा लागेल, ज्याला लौकीकार्थानी घटस्फोट (डायव्होर्स) घेणं म्हणतात. प्रेमात पडून लव्ह म्यारेज केलेल्या जोडप्यांना "इतक्या adjustments करायला लागतील हे मला माहिती नव्हतं" असं म्हणायला फक्त टेक्निकली चान्स नसतो.
“आयुष्यात adjustments करायच्या असतात, adjustments करण्यातच सगळं आयुष्य घालवायचं नसतं”.

No comments:

Post a Comment