Sunday, 30 August 2015

आयकरला पर्याय व्ययकर

'आयकरला पर्याय व्ययकर '
(हा लेख महाराष्ट्र टाइम्स मध्ये २६/०२/२०१४ च्या अंकात प्रसिद्ध झाला आहे.)
अर्थव्यवस्था चालवायची म्हटल्यास वेगवेगळे कर आकरणे गरजेचे असते. या सर्व करापैकी एक महत्वाचा कर म्हणजे
'आयकर' . आयकराची आकरणी वेगवेगळ्या उत्पन्नावर वेगवेगळ्या दरानुसार केली जाते. वरवर पाहता आयकर
श्रीमंतांवर जास्त आणि गरिबांवर कमी आकरल्या जातो असा भास होतो. परंतू प्रत्यक्षात असे घडतेच असे
नाही. कराची आकरणी करदात्याच्या उत्पन्नावर आधारित न राहता, करदात्याच्या करदेय क्षमतेवर आधारित
असावी. समजा 'अ' आणि 'ब' व्यक्तिचे समान उत्पन्न आहे. 'अ' व्यक्तीच्या घरी त्याची पत्नीही कमावती आहे
आणि त्याच्यावर अवलंबून असणारे कुटुंबही लहान आहे. शिवाय आजाराचा खर्चही कमी. तर 'ब' व्यक्तीच्या
कुटुंबाचे उत्पन्न कमी (कारण तो एकटाच कमवणारा आहे), जवाबदाऱ्या जास्त शिवाय कुटुंबाच्या आजाराचाही
खर्च आहे. त्यामुळे 'ब' या कुटुंबाची पाहिजे तशी प्रगती होत नाही. त्यामुळे असा कर असावा ज्याची चैनीच्या
वस्तुची क्रय शक्ती जास्त त्याच्यावर जास्त कर, ज्याची चैनीच्या वस्तुची क्रय शक्ती कमी त्याच्यावर कमी
कर आकारणी व्हावी. ज्यामुळे श्रीमंत-गरीब यामधिल दरी कमी होईल.
यात काही शंका नाही की आयकरामुळे काळा पैसा निर्माण होतो. काळा पैसा केवळ सरकारला आयकर
दिला नाही म्हणून चिंतेचा विषय नाही, तर हा काळा पैसा व्यवहारात नसल्यामुळे अर्थव्यवस्थेची विकासाची
गती खालावते. ह्या पैशाची गुंतवणूक केली जात नाही. त्यामुळे या पैशापासून होणारी रोजगार निर्मिती
होवू शकत नाही. शिवाय वाम मार्गाने मिळवलेला पैसा अधिकृत नसल्याने तो सरकारपासून लपवल्या जातो.
त्यामुळे काळ्या पैशाची निर्मिती अटळ असते. विशेष म्हणजे या काळ्या पैशातून आणखी काळ्या पैशाची
निर्मिती होते. जसे एकाने काळा पैसा जमवला. त्याला घर घ्यायचे असेल, ती व्यक्ती बिल्डरला काळा पैसा
देतो. अधिकृत व्यवहारानुसार घर Rs. 25,00,000/- लाखाचे असेल, पण ते घर प्रत्यक्षात दिलेल्या काळ्या पैशाचा
विचार केला तर कितीतरी महाग असूू शकते. खरे तर बिल्डरला मिळालेल्या काळ्या पैशाचा हिशेब येथेच संपत
नाही. घराची किंमत कमी करण्यासाठी हा मिळालेला काळा पैसा बिल्डर सामुग्री पुरवठादाराला देईल.
अशारितीने हा कमी दिसणारा काळा पैसा प्रत्यक्षात मोठ्या प्रमाणात तयार होतो.
काळा पैसा निर्मितीचे दुसरे उदाहरण द्यायचे झाल्यास अनेक व्यापारी, व्यावसायिक आणि काळा पैसा
असणारे व्यक्ती आपल्या व्यवहाराची नोंद करतात. प्रत्यक्षात नोंद कलेल्या नोंदी पेक्षा तो व्यवहार काही
पटीत असतो. जसे एका व्यापाऱ्याने दुसऱ्या व्यापाऱ्याला दोन पोते गव्हाची मागणी केली. परंतू प्रत्यक्षात
दहा पोते गहू पाठवण्यात येतो. कारण या दोन व्यापाऱ्यादरम्यान ठरल्याप्रमाणे पाच पटीत व्यवहार करण्यात
येतो. दुसरा व्यापारी पैसे देताना पाच पटीतच पैसे देतो. असे अनेक व्यवहार लेबर पेमेंट, आंतरिक सजावटीची
सामुग्री, वकील इत्यादी दरम्यान मोठ्या प्रमाणात घडतात. आयकराचे दोष लक्षात घेता या कराला पर्याय
निवडताना आयकराचे दोष कमी होऊन नवीन कराद्वारे सरकारला विकासासाठी पैसा उपलब्ध होईल आणि
पर्यायी कर जनतेसाठी न्यायोचीत राहील याचा विचार व्हायला हवा.
सध्या आयकर बंद करून नवीन पर्यायी कर सुरू करण्याची चर्चा जोरात सुरू आहे. आयकराला पर्याय म्हणून 'व्यवहार
कर' (Transaction Tax) सुरू करावा असे सुचविले जात आहे. हा व्यवहार कर खरेच आयकराला पर्याय ठरू शकतो ? हा
नवीन कर केंद्र सरकारला आयकराएवढे उत्पन्न देवू शकेल ? हा नवीन कर जनतेसाठी न्यायोचीत असू शकेल ? नवीन
कर वाचवण्याच्या कमी प्रमाणात पळवाटा असू शकतात ? असे अनेक प्रश्न निर्माण होतात.
या सर्व प्रश्नांची उत्तरे शोधल्यास 'व्यवहार कर' हा आयकराला पर्याय ठरू शकत नाही. अर्थव्यवस्थेत अनेक
आर्थिक व्यवहार होत असतात. एवढ्या व्यवहारावर खास करून रोखीच्या व्यवहारावर लक्ष ठेवणे कठीण आहे.
लक्ष ठेवण्यालायक व्यवहार म्हणजे कायद्याने बंधनकारक असलेले - जसे घराची रजिस्ट्रि इत्यादी, बँकेचे व्यवहार,
आणि इंटरनेटवरून होणारे RTGS व NEFTचे व्यवहार. RTGS या माध्यमातून Rs. 2,00,000/- चे वरील व्यवहार आणि
NEFT या माध्यमातून Rs. 2,00,000/- पेक्षा कमी आणि वरील सर्व निधी पाठविण्याचे व्यवहार केले जातात. हे
सर्व व्यवहार व्यावसायिक उपयोगासाठीच केले जातात असे नाही. कर्जाची राशी, मदतीसाठी पाठवलेला
निधी, एका खात्यातून दुसऱ्या खात्यात पाठवलेला निधी अशा कितीतरी उपयोगासाठी RTGS आणि NEFT
चा उपयोग केल्या जातो. त्यामुळे प्रत्येक व्यवहारावर 'व्यवहार कर' आकारणे योग्य ठरणार नाही. आयकराला
पर्याय निवडताना 'व्यवहार कर' सोप्या पळवाटा असणारा वाटतो. जसे, व्यावसायिक जास्तीत जास्त
व्यवहार रोखीत करतील. एकाची रोकड दुसऱ्याला, दुसऱ्याची तिसऱ्याला अशारितीने व्यवहार रोकडीत
होतील. शिवाय एकाच रकमेवर अनेकवेळा व्यवहार कर आकरल्या जाण्याची श्यक्यता आहे. जसे, एकाने बँकेकडून
घरासाठी कर्ज घेतले त्यावर 'व्यवहार कर', बिल्डरला पैसे दिले त्यावर 'व्यवहार कर', बिल्डरने सामुग्री
पुरवठादाराला पैसे दिले त्यावर 'व्यवहार कर'. अशाप्रकारे अनेक व्यवहार दिसणारे व्यवहार एकच असू शकतात.
शेवटी सर्व व्यवहार झाल्यावर अंतिम भार मूळ व्यवहार कर्त्यावर येईल. कारण बिल्डर, सामुग्री पुरवठादार
स्वतःच्या खिश्यातून 'व्यवहार कर' भरणार नाही. जर काही व्यवहारावर सवलती दिल्या तरी व्यवहार कराला
बगल देवून व्यवहार रोखीत केल्या जातील. अशाप्रकारे 'व्यवहार कर' हा पर्याय आयकराला व्यवहार्य ठरणार
नाही.
अर्थव्यवस्थेत सकल उत्पन्न बरोबर सकल खर्च अधिक सकल बचत असते. आयकराची उत्पत्ती ही देशाच्या सकल
उत्पन्नाशी निगडित आहे. आयकर हा व्यक्ती, संस्था, कंपनी इत्यादींच्या उत्पन्नावर आकरल्या जातो.
देशातील हे सर्व कर आकरणी झालेले उत्पन्न सकल उत्पन्न होय. कारण करपात्र उत्पन्नासोबत सवलती दिलेले आणि
शून्य टक्के कर आकारणी झालेले उत्पन्न यात अंतर्भूत असते. म्हणजे आयकराला पर्याय निवडताना सरकारला
आयकराएवढाच प्रभावी पर्यायी कर असावा.
सर्व बाजूंनी विचार केल्यास 'व्ययकर' ('ExpenditureTax') आयकराला पर्याय ठरू शकतो. कारण अर्थव्यवस्थेत सकल
आय बरोबर सकल व्यय अधिक बचत असते. 'व्ययकर' म्हणजे 'सरकारने निश्चित केलेल्या विशिष्ट वस्तुच्या खर्चावर
आकारलेला आणि अंतिम उपभोक्त्याकडून घेतलेला कर होय.'
या कराचे वैशिष्ट्य म्हणजे करदाता किती उत्पन्न कमावतो याकडे लक्ष न देता तो खर्च काय करतो यावर
व्ययकराची आकारणी अवलंबून राहील. ज्याचे उत्पन्न जास्त त्याची क्रयशक्ती जास्त त्याच्यावर जास्त कर.
एकंदरीत ज्याचे उत्पन्न जास्त त्याला अधिक कर द्यावा लागेल. आणि हे देशासाठी व जनतेसाठी न्यायोचीत
ठरेल.
व्ययकराची अंमलबजावनी करताना खालील घटकांचा विचार करायला हवा. ज्यमुळे 'व्ययकर' न्यायोचीत व
उपयोगी ठरू शकतो.
1) 'व्ययकर' आवश्यक आणि नित्यपयोगी वस्तू व सेवांवर लावू ऩये. - या वस्तूंवर कर आकरल्यास गरीब जनतेस जगणे
कठीण होऊन कराची आकारणी सुद्धा गुंतागुंतीची होईल. जगण्यासाठी लागणाऱ्या वस्तू स्वस्त राहिल्यास
उपभोक्त्याच्या आर्थिक बचतीत वाढ होईल आणि त्याच्या राहणीमानात सुधारणा होईल.
2) 'व्ययकर' चैनीच्या, महागड्या आणि ज्याची खरेदी एखाद्यावेळी होते व ती आवश्यक तसेच मूलभूत गरज नाही
या वस्तूंवर आणि सेवांवर कर आकरणी करावी. - जसे चारचाकी वाहन, दुचाकी वाहन, इलेक्ट्रानिक्स वस्तू,
घरगुती उपकरणे, विमान प्रवास, फिरण्यासाठी गेलेल्या विदेशवारीवरील खर्चावर आणि अशाप्रकारच्या वस्तू
व सेवांवर 'व्ययकर' आकरल्या जावा कारण अशा ग्राहकांची क्रयशक्ती जास्त असते म्हणून व्ययकराची
आकारणी न्यायोचीत ठरते.
3) काही वस्तू आवश्यक असतात परंतू त्यावर मोठ्या प्रमाणात खर्च करण्याची आवश्यकता नसते अशा वस्तूंवर
काही किंमतीच्या मर्यादेत 'व्ययकर' आकरल्या जावू नये. - आधुनिक काळातील मोबाइल फोन, टेलिव्हिजन, घर ,
संगणक, कपडे इत्यादी वस्तूंवर कर आकरताना सरकारने विचारपुर्वक व्ययकराची आकारणी करावी़ या वस्तु
आवश्यक आहे पण त्यावर मोठ्या प्रमाणात खर्च करण्याची आवश्यकता नाही. या वस्तू जशा महाग होत जातात
त्यावेळी तंत्र विकसित होत जाते आणि अनेक सोयी उपलब्ध होतात. अशा वेळी सरकारने आवश्यक तंत्र आणि
सोयी उपलब्ध होईल याची मर्यादा निश्चित करून व्ययकराची आकारणी करावी.
4) 'व्ययकर' विक्री किंमतीत समाविष्ट असावा आणि कराची वसुली अंतिम उपभोक्त्याकडून व्हावी. त्यामुळे
कर संकलन पद्धत सरळ, सोपी आणि योग्य रितीने होईल. व्ययकराचा विक्री किंमतीत समावेश असल्यामुळे
खरेदीदारास व्ययकराची जाणीव होणार नाही.
5) एकदा व्ययकराची आकारणी झाल्यानंतर त्या वस्तूच्या पुनर्विनिमयावर व्ययकराची आकारणी होऊ नये.
6) जर विक्रत्याने उपभोक्त्यास वस्तू विकली नसेल किंवा अगोदरच्या विक्रत्यास परत केली असेल अशा वेळी
व्ययकराची आकारणी होऊ नये - जर विक्रत्याने वस्तू स्वतः ठेवली असेल किंवा कमी किमतीत विकली असेल
अशावेळी व्ययकराची आकारणी व्हावी.
व्ययकराची आकरणी योग्य का ?
आधुनिक काळात मूलभूत गरजेची व्याख्या ठरवणे कठीण आहे. प्रत्येक व्यक्तिनुसार मूलभूत गरज बदलण्याची शक्यता
आहे. त्यामुळे मूलभूत गरजेला चौकटीत बांधणे शक्य नाही. प्रत्येक व्यक्ती / कुटुंब आपली मूलभूत गरज ठरवतो असे
गृहीत धरण्यास हरकत नाही. एकदा उपभोक्त्याच्या मूलभूत गरजा पूर्ण झाल्यावर उपभोक्ता आपल्या ऐच्छिक
गरजा पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो. या ऐच्छिक गरजांना व्यक्ती प्राधान्य क्रम देतो. प्राधान्य क्रमाने पहिली
येणारी वस्तू त्या व्यक्तिची 'किमान ऐच्छिक गरज' बनते. प्राधान्य क्रमाने पहिली येणारी वस्तू इतर वस्तूपेक्षा
स्वस्त असेलच असे नाही. उदाहरणार्थ - एखादा व्यक्ती कार अगोदर आणि मायक्रोवेव्ह ओवन नंतर खरेदी करू
शकतो. याचा अर्थ व्यक्तीच्या वागणूकीत ऐच्छिक गरज म्हणजे आवश्यकता असतेच असे नाही.
‘किमान ऐच्छिक गरज' म्हणजे काय?
'उपभोक्ता आपल्या राहणीमानानुसार किंवा राहणीमानात बसत नसेल तरी आपल्या कुवतीत बसेल अशी वस्तू
खरेदी करण्याला प्राधान्य देतो हीच किमान ऐच्छिक गरज होय.'
प्रत्येक व्यक्ती राहणीमानानुसार दिखाऊ प्रवृत्तीमुळे वस्तू घेण्याची इच्छा बाळगतो. ही इच्छाच त्या
व्यक्तिची 'किमान ऐच्छिक गरज' बनते. आधुनिक आर्थिक युगात 'किमान ऐच्छिक गरज' म्हणजे व्यक्ती ज्या
राहणीमानात चांगल्या तऱ्हेने जगू शकतो त्या राहणीमानात न जगता, तो त्यापेक्षा वरच्या राहणीमानात
जगण्याचा प्रयत्न करतो. म्हणून आधुनिक काळात किमान गरजांचा अर्थ पुस्तकात जरी बदलला नसेल तरी
व्यक्तीच्या वागणुकीत बदलला आहे. म्हणून काही वाक्ये आपण नेहमीच ऐकतो जसे - आपल्याकडे किमान कार
तरी हवी, ज्याच्याकडे कार असेल तो म्हणतो आपल्याकडे किमान अमुक कंपनिची कार तरी हवी, ज्याच्यकडे
चांगले घर असेल तो म्हणतो किमान बंगला किंवा फार्महाऊस तरी हवा इत्यादी. प्रत्येक व्यक्ती किमान
ऐच्छिक गरजांची इच्छा बाळगतो. तो त्या पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो. या सर्व इच्छांची पूर्तता होईलच असे
नाही. पण या किमान ऐच्छिक गरजा जेंव्हा पूर्ण करतो तेंव्हा सरकारने ज्या वस्तूवर व्ययकर आकारण्याचे
निश्चित केले आहे त्या वस्तूची खरेदी केली की व्ययकराची प्राप्ती होते.
किमान ऐच्छिक गरजा प्रत्येक व्यक्तीच्या वेगवेगळ्या असतात. एखाद्या व्यक्तीच्या किमान ऐच्छिक गरजात
मुलांच्या शिक्षणाचा अंतर्भाव असेल, तर दुसऱ्याच्या किमान ऐच्छिक गरजात कुटुंबाचाआजार असू शकतो.
मूलभूत गरजा पूर्ण झाल्यावर व्यक्ती त्याच्या किमान ऐच्छिक गरजांची पुर्तता करण्याचा प्रयत्न करतो. ही
किमान ऐच्छिक गरजच व्ययकरासाठी महत्वाची आहे. समजा एखादा व्यक्ती दारिद्र्य रेषेखाली जगत असेल तर
त्याच्यासाठी मूलभूत गरजा या किमान ऐच्छिक गरजा असू शकतात़ परंतू करदेय क्षमतेचा विचार करताना मूलभूत
गरज पूर्ण झाल्यावर राहणीमानात जशी-जशी सुधारणा होत जाते तशा-तशा व्यक्तिच्या किमान ऐच्छिक
गरजात वाढ होत जाते़ व्यक्तिच्या राहणीमानात वाढ होते याचा अर्थ व्यक्तिच्या उत्पन्नात वाढ होत आहे
असा होतो. पुष्कळदा कागदावर किंवा सरकारी पाहणीनुसार एखादा व्यक्ती गरीब किंवा दारिद्र्यरेषेखाली
जगतो असे समजण्यात येते. प्रत्यक्षात त्याच्याकडे मोटरसायकल असते किंवा एखाद्याकडे दुसरा फ्लँट सुध्दा
असतो जो किरायाने दिलेला असतो. म्हणूनच आपण आज झोपडपट्टीत मोठ्या प्रमाणात मोटरसायकली
पाहतो. अशा लोकांची क्रयशक्ती जास्त असते. परंतूू सरकारी सवलतींचा लाभ घेण्याकरिता आणि 'आयकर'
वाचवण्यासाठी हे सर्व करीत असतात. 'व्ययकर' अस्तित्वात असल्यास या प्रकारांना बऱ्याच प्रमाणात आळा
बसेल.
बरेचदा चर्चेत श्रीमंत व्यक्ती असा एखाद्या व्यक्तिचा उल्लेख केल्या जातो. कधी-कधी दोन व्यक्ती
किंवा समुहाचा तुलनात्मक विचार करून गरीब-श्रीमंत ठरवल्या जातात. अशाप्रकारे श्रीमंत-गरीब ठरवणे चुकीचे
आहे. श्रीमंत
व्यक्ती जो असतो ज्या व्यक्तिच्या संपूर्ण गरजा पूर्ण झाल्या आहेत आणि त्याला कितीही धन प्राप्त झाले
तरी कोणतीही वस्तू घेण्याची इच्छा राहणार नाही. व्ययकराच्या अंमलबजावणीचा हाच नेमका फायदा होईल
की ज्यामुळे गरीब-श्रीमंत या वादात न पडता सरकारने व्ययकर ज्या वस्तूवर आकाण्याचे निश्चित केले आहे त्या
वस्तूची खरेदी केली की व्ययकर द्यावा लागेल.
व्ययकरामुळे महागाई वाढेल असा बऱ्याच लोकांचा समज होऊ शकतो. प्रत्यक्षात व्ययकर आकारण्यात आलेल्या
वस्तू मुळात आवश्यक वस्तू नसल्यामुळे आणि या सर्व वस्तू महाग असल्यामुळे हा जो खरेदीदार असतो त्याची
क्रयशक्ती जास्त असते. त्यामुळे या वस्तू थोड्या महाग झाल्यास विशेष फरक पडणार नाही. उलट बरेचदा हे
खरेदीदार दिखाऊ प्रवृत्तीमुळे जास्त महाग वस्तू खरेदी करतात .साधारणतः या वस्तू एखाद्यावेळीच खरेदी
करण्यात येतात. वेगवेगळ्या वस्तुवर वेगवेगळा व्ययकर न्यायसंगत आहे. शिवाय आयकरापासून सुटका झाल्यामुळे या
व्यक्तिंचे उत्पन्न वाढलेलेच असेल.
आयकर आकारणीतल नेमका दोष म्हणजे व्यक्तिच्या क्रयशक्तीचा विचार केल्या जात नाही. व्ययकर
आकारल्याणे व्यक्ती / कुटुंब कोणत्या पध्दतीने उत्पन्न कमावते याला महत्व न देता उपभोक्ता काय वस्तू खरेदी
करतो त्यावर व्ययकर आधारलेला आहे. व्ययकर अंतिम उपभोक्त्याकडून वसूल केल्या जात असल्याने उपभोक्ता वस्तू
खरेदी करताना म्हणजेच 'किमान ऐच्छिक गरज' पूर्ण करण्याअगोदर त्या वस्तुची किंमत पाहून बजेट तयार करेल.
व्ययकर कमाल विक्री किंमतीत (MRP) समाविष्ट असल्याने ती वस्तू घेणाऱ्याला व्ययकराची जाणीव होणार
नाही. जर व्यक्ती किंवा कुटुंब वाम मार्गाने उत्पन्न कमावत असेल तर तो व्ययकराचा दोष नाही, तर तो
देशाच्या कारभारचा दोष आहे. हा वाममार्गाने मिळवलेला पैसा आयकर असताना सुध्दा होताच. आयकराच्या
भीतीनेे लपवल्या जात होता तो पैसा चलनात आल्याने , क्रयशक्ती वाढल्याने अर्थव्यवस्थेत वस्तुची मागणी
वाढेल. त्यामुळे गुंतवणुकीत वाढ होऊन रोजगारात वाढ होईल व देशाच्या विकासात हातभार लागेल.
आयकराच्या भीतीने परदेशी बँकेत असलेला काळा पैसा आपोआपच भारतात परत येईल. अशाप्रकारे आयकराच्या
काळातील दुष्टचक्र नष्ट होऊन अर्थव्यवस्थेत सुष्टचक्र निर्माण होईल.
व्ययकराची संकलन पध्दती
कर संकलन ही एक गुंतागुंतीची प्रक्रिया असते. परंतू आधुनिक तंत्राच्या साहय्याने व्ययकराचे संकलन सुलभ होऊ
शकते.
1) आयकरासाठी असलेल्या पँन नंबर प्रमाणे वस्तू व सेवा पुरवणाऱ्या, उत्पादन कर्ता, धाऊक व्यापारी, किरकोळ
व्यापारी तसेच खरेदी-विक्रीच्या व्यवहारात गुंतलेल्या सर्वांना व्ययकर अकाउंट नंबर देण्यात यावा आणि त्या
अकाउंट नंबरची पावतीवर नोंद असावी. या व्ययकर अकाउंट नंबर मध्ये व्ययकर क्षेत्राच्या कोडचा अंतर्भाव
असावा. त्यामुळे त्या क्षेत्रातील व्ययकर कार्यालयाचे नियंत्रण राहील. अंतिम उपभोक्त्याचा पावतीवर
व्ययकर अकाउंट नंबर लिहण्यात यावा. तसेच हा व्ययकर अकाउंट नंबर पाडताळणीसाठी उपलब्ध असावा. अंतिम
उपभोक्त्यासाठी सध्या असलेला पँन नंबर सुरू ठेवावा. व्ययकर अकाउंट नंबर असलेला व्यापारी ज्यावेळी अंतिम
उपभोक्ता म्हणून खरेदी करेल त्यावेळी पँन नंबरचा वापर करेल.
2) सरकारने एक संगणक सॉफ्टवेअर बनवावे जे इंटरनेटच्या माध्यमाद्वारे सर्वांना उपलब्ध होईल. ते सॉफ्टवेअर सर्व
खरेदी-विक्रीत गुंतलेल्यांनी त्यांच्या संगणकात लोड करावे. जर एखादा व्यापारी इंटरनेटचा वापर करत नसेल, तर
त्या क्षेत्रात असलेल्या व्ययकर कार्यालयात विशिष्ट कालावधित व्ययकर बँकेत भरल्याची पावती आणि इतर
कागदपत्रे न्यावे. व्ययकर कार्यालयातील कर्मचारी त्याचा अकाउंट उघडून त्यात नोंदी करतील.
3) सर्वात अगोदर उत्पादन कर्ता, सेवा पुरवणारा माल पाठवल्याबरोबर ताबडतोब त्याच्या आँनलाइन
अकाउंटवर ज्याला माल पाठवला त्याच्या अकाउंट नंबरसह किती माल पाठवला वैगरे माहिती भरेल.
पुरवठादाराने ज्याला विक्री केली आहे त्याच्या व्ययकर अकाउंट मध्ये आपोआपच नोंद होईल आणि व्ययकराची
राशीसुध्दा दाखवली जाईल. नंतर हा खरेदीदार ज्याला माल पाठवेल तो विक्रेता सुरवातिच्या
पुरवठादाराप्रमाणे माहिती भरेल. पूर्वी प्रमाणेच खरेदीदाराच्या अकाउंटमधे नोंद होईल. अशाप्रकारे अंतिम
उपभोक्त्यास माल विकणाऱ्या विक्रेत्याच्या अकाउंटमध्ये नोंद होईल. ज्यावेळी हा माल अंतिम विक्रेता
उपभोक्त्यास विकेल त्यावेळी MRPमध्ये समावेश असलेली आणि त्याच्या अकाउंट मध्ये दाखवलेली व्ययकराची
राशी सरकारी व्ययकर बँक खात्यात
जमा करेल. ही व्ययकर राशी बँकेत किंवा इंटरनेटच्या व्दारे भरता येईल. ही व्ययकराची राशी सरकारने निश्चित
केलेल्या कालावधीत जसे - दैनिक / साप्तहिक / मासिक भरेल. या व्ययकर संकलन पध्दती मुळे वस्तू कोणी
कोणास विकली, तसेच या वस्तूच्या खरेदी-विक्रीत गुंतलेल्या सर्वांची माहिती व्ययकर अकाउंट मध्ये उपलब्ध
होईल. त्यामुळे व्ययकर कार्यालयातून व्ययकर बरोबर जमा होतो की नाही याचे अंकेक्षण (Audit) करता येईल.
व्ययकर कार्यालयाच्या अखत्यारीत असलेल्या क्षेत्रातील दुकानांचे अंकेक्षण क्षेत्रीय व्ययकर कार्यालय
करतील.
4) एखादा व्यापारी व्ययकराची आकारणी आवश्यक असलेली वस्तू विकत असेल आणि त्याने व्ययकर संकलन
पध्दतीची अंमलबजावणी केली नसल्यास किंवा अशी वस्तू दुकानात जरी आढळल्यास त्याच्यावर
कारवाई केली जावू शकते.
5) एखाद्या अंतिम उपभोक्त्याने एखादी वस्तू घेतली असेल त्याच्या पावतीवर ज्याच्याकडून वस्तू घेतली असेल
त्याचा व्ययकर अकाउंट नंबर असेल. जर समजा पावती हरवली तरी ती वस्तू ज्याच्याकडून घेतली त्याच्याकडे या
व्यक्तिला वस्तू विकल्याची नोंद राहील. ही नोंद वस्तू विकताना व्ययकर संकलन पध्दतीनेे वस्तू विकली होती
याची पाडताळणी विक्रेत्याकडे न जाता व्ययकर कार्यालयाचे कर्मचारी विक्रेताचा अकाउंट उघडून करू
शकतात.
6) बरेच व्यापारी वाममार्गाने इलेक्ट्रॉनिक्स वस्तूची आयात करतात. व्ययकर संकलन पध्दतीमुळे विना व्ययकर
आकारलेली वस्तू विकणे किंवा खरेदी करणे आर्थिक गुन्हा ठरवल्यास कडक कारवाई केल्या जावू शकते. त्यामुळे
तस्करिने येणाऱ्या मालावर सरकारला नियंत्रण ठेवता येईल. याचा फायदा भारतीय चलन गैरमार्गाने विदेशात
जाणार नाही. त्यामुळे रुपयाची घसरण कमी होण्यास मदत होईल.

Thursday, 27 August 2015

Inspiration source




वृद्ध कोल्हा महाराज, विशाल जबडा हालवीत 

मनसोक्त हसायचा प्रयत्न करू लागले. 

समोर उभा ठाकलेला कोल्हु सेनापती, 
महाराज आपल्या समाज-तोडण्याच्या करामतींनी खुष झालेले पाहून 
हरखून गेला. 
त्याच्या डोईवरचे शिल्लक कुरळे केस माजात थरारले. 
बघता बघता ठीक ठिकाणाचे शागीर्द आपल्या 'हरीण-विरोधी' 
विषारी हरकतींचे भेसूर वर्णन करू लागले. 
कोल्हा महाराज मजेत कान देवून ऐकत राहिले. 
आपल्या लबाड कारकिर्दीचे खरे ईप्सित परत एकवार साध्य होत असल्याचे पाहून त्यांना आंतरिक गुदगुल्या होत होत्या !
हा असा सगळा आनंद सोहळा सुरु असताना 
कोल्हा महाराज अचानक सावध झाले. 
दूर, जंगलाच्या पठारावरून , वृक्षांच्या गर्दीतून सावध, प्रयत्नपूर्वक वाट काढीत हरीणांचे कळप दौडत पुढे जात होते. 
त्यांच्या एकसंध , चिवट प्रयत्नांच्या ताकदीचे आणि सच्चेपणाचे तेज 
भोवती वलय बनून हालत होते.......
काळवंडल्या चेहेर्याने कोल्हा महाराजाने नजर फिरवून समोर पाहिले. 
परंतु ,असुयेचे अंगार ओकणाऱ्या डोळ्यांनी हरीणांच्या कळपाकडे पाहणारे प्रमुख कोल्हा-सरदार पाहून त्यांना लगेच बरे वाटले. 
क्षणभर खिन्न झालेले मन परत खुलले. 
आता नेहेमीच्या सराईत मुत्सुद्दीपणे कोल्हा महाराज 
पुढच्या योजना आखू लागले. 
अल्पसंख्य , तेजस्वी हरीणांचे खच्चीकरण ! 
एकच ध्येय . सध्यातरी . 
कारकीर्दीच्या उतरत्या काळात आणि कळेत रक्तरंजित, विघातक का होईना 
पण ठसा उमटविण्याचा एक प्रयत्न. 
जंगलच्या इतिहासकारांच्या 'कोल्हा महाराजांची कारकीर्द' प्रकरणात 
आणखी एक काळे पान. 
एवढ्या बलाढ्य प्राणी-राजाच्या शिरपेचात,
एकही विधायक कामाचे सुवर्णपंख नसावे याची कोणाला खंत ना खेद ! चालायचेच. कमनशीब. 
असो. 
मगाशी गेलेल्या हरीणांच्या कळपातल्या मित्रांबरोबर खेळायला आणि 
चार शहाणपणाच्या गोष्टी शेअर करायला अधीर झालेले बरेचसे कोल्हा सैनिक, महाराजांची आणि त्यांच्या खास शिलेदारांची नजर चुकवून मागच्या मागे पसार झाले...........
द्वेषाच्या धुंद कैफात मश्गुल झालेल्या धूर्त आणि मुत्सुद्दी कोल्हा महाराजांच्या नजरेतून हे सुटले नाही. पण त्यांनी तसे दाखवले नाही. 
त्यांच्या मनाचा गाभा कधीच कुणाला कळला नाही. खुद्द त्यांनाही

Love Vs Arrange Marriage


 लव्ह म्यारेज किंवा अरेंज्ड म्यारेज, काही का असेना.........ते टिकवणं
हे जास्त महत्वाचं असतं असं माझं मत आहे.....एका जोडीच्या अनुभवाच्या फुटपट्टीवर (सासू-सासरे अथवा मुलीचे आई-वडील..तसंच इतर नातेवाईक) नवपरिणीत जोडप्याला सगळेच्या सगळे रुल्स लागू पडत नाहीत...there is no best known method .....प्रत्येक केस युनिक असते.....
माझ्या एका मित्राच्या मुलीनी मला फार पूर्वी विचारलं होता की "रंगा काका तू असं का म्हणतोस की लग्न ठरवलंस तर शक्यतो स्वधर्मी, स्वजातीय मुलाशी ठरव?.. आणि आपल्याकडे अरेंज्ड म्यारेज करताना सहसा स्वजातीय, स्वधर्मीय अशीच स्थळं का बघतात?....... इतर लोक वाईट असतात का?”
मी तिला असं उत्तर दिलं होतं......
"माणसं वाईट नसतात पण माणसांच्या सवयी नक्की ‘वेगवेगळ्या’ असतात. आपण जेंव्हा ट्रेकला
जातो, किंवा ट्रीपला जातो, तेंव्हा आपल्या बरोबर असलेले लोक हे दरवेळेस आपल्या चॉइसचेच असतात असं नाही. अनेक जाती धर्माचे अनोळखी लोक असतात. त्यांच्या बरोबर आपण तो ट्रेक किंवा ट्रीप अनुभवत असतो, तेंव्हा त्यांच्या काही सवयी आपल्याला जाणवतात. काही खटकतात पण आपण काही वेळ त्या सहन करतो, adjust करतो. कारण आपल्याला माहिती असतं, की हा ट्रेक किंवा ट्रीप थोड्या दिवसांची आहे. तसंच एखाद्या सवयीचा, फारच त्रास होत असेल तर आपण ग्रुप बदलतो, रूम \ हॉल बदलतो वगैरे. लग्न म्हणजे ट्रीपला जाणं नाही, उभ्या आयुष्याचा सवाल असतो…..प्रचंड वेगळ्या सवयी असलेला माणूस तुला 24x7 आयुष्यभर जोडीदार म्हणून चालेल का? असा विचार तू करून बघ आणि "त्याच्यापेक्षा भिन्न सवयी असलेली तू, त्याला बायको म्हणून आणि त्याच्या घरी सून म्हणून कायमची चालशील का?" ह्याचं उत्तर त्यांनी द्यायचंय, तू नाही.
आर्थिक स्तर जर का सारखाच आहे असं गृहीत धरलं तर, एका धर्मात किंवा एका जातीत असलेल्या कुटुंबांच्या घरातल्या जगण्या वागण्याच्या दैनंदिन चालीरीती ह्या बर्यापैकी सारख्या असतात आणि त्या प्रथा, परम्परेनी, संस्कारांनी आलेल्या असतात. काही चालीरीती, सवयी ह्या विशिष्ट घराण्यातल्या चालीरीती, कर्मकांड यानुसार असू शकतात. घरा-घराप्रमाणे त्या वेगळ्या असतात आणि उरलेल्या सवयी ह्या वैयक्तिक (व्यक्तीसापेक्ष) असतात. ह्यातल्या कोणत्याही जाती-धर्माच्या सवयींना मी 'वाईट' असं टयाग करत नाही, पण 'वेगळ्या' मात्र नक्कीच म्हणून शकीन.
अरेंज्ड म्यारेजमधे शक्यतो स्वधर्मीय, स्वजातीय स्थळं बघतात कारण आपल्या मुलीला कमीत कमी adjustments करायला लागव्यात हा आई-वडिलांचा हेतू असू शकतो. जर त्याच धर्मात पण पोट जातीत, उपजातीत लग्न केलं तर adjustment चं प्रमाण थोडं वाढेल, पण जर पूर्णपणे वेगळ्याच जाती-धर्माच्या मुलाशी लग्न केलं तर मुलीला (आणि मुलाच्या घरच्यांनासुद्धा) खूप मोठ्या प्रमाणत adjustments करायला लागायची शक्यता असते. सर्व गोष्टीना अपवाद असतात; मी अपवादात्मक उदाहरणान्बद्दल बोलत नाहीये, किंबहुना तिथे बोलायला वावच नसतो. जर adjustments करता आल्या नाहीत तर लग्नानंतर एक तर भांडून वेगळं रहावं लागेल किंवा साथीदार बदलावा लागेल, ज्याला लौकीकार्थानी घटस्फोट (डायव्होर्स) घेणं म्हणतात. प्रेमात पडून लव्ह म्यारेज केलेल्या जोडप्यांना "इतक्या adjustments करायला लागतील हे मला माहिती नव्हतं" असं म्हणायला फक्त टेक्निकली चान्स नसतो.
“आयुष्यात adjustments करायच्या असतात, adjustments करण्यातच सगळं आयुष्य घालवायचं नसतं”.

Breaking News

Breaking News



एक 22 वर्षीय तरुण काय करु शकतो याचा प्रत्यक्ष अनुभव घेतला हार्दिक पटेल ने फ़क्त गुजरातला हे आव्हान नाही तर थेट दिल्ली ला केले...भारतात अनेक आंदोलन जाळपोळ दंगली झाल्यात आणि होत आहेत पण पण हार्दिक च्या आंदोलनाला पंतप्रधान यांना शांततेच आव्हान करण्याची वेळ आली...

Letter Of Appreciation

letter of appreciation


My dear Friends, how are you? I can see that you are waking up everyday with me at 04:30 hrs IST. Amazing! You are my saviour! I am working all the more harder than ever before to salvage Pride and Prejudice. I cannot give up my life and you know that. Facebook is my life! And by the time I near my Judgement Day, I want you to tell the world that there was one man from Solapur who loved all of his friends from the bottom of his soul, come whatever. And all this when we have never seen each other! That is the beauty of facebook. Our souls remain connected! But one thing is for sure. Love, Respect and Admiration are some of the essential qualities if you want to win this World. If we start loving each other, there would be no war on this earth and we will never be required to manufacture Atom Bombs. I have had a closer look at life and I have concluded that the root cause of entire suffering in this world is indiscriminate killing of animals and trees. And unless we stop this, Peace and Tranquility will never Prevail on this earth. We all are nearing the End Of This World for we have let ourselves down in the eyes of God who in on the move. Keep it simple! The One Who Has Created This Entire Universe Has An Equal Right To Destroy It If Things Go To Extremity. High time the World wakes up to this fact and stop killing innocent animals who have never harmed mankind in any way whatsoever and deserve an equal Right To Live On This Earth. Every Living Creature Is A Creation Of God! What moral right do we have to slit their throats so as to be served in our pallets? Unless we stop this, WAR is INEVITABLE and should become the regular feature of the 21st Century. Is the World listening to me?

Thursday, 20 August 2015

Why You Struggle?

Why did you struggle in life is there any reason for this kind of situation in life?

Life is a beautiful struggle so please struggle 
Because where there is no struggle there is no way for success