Saturday, 12 December 2015

Success of poor people marathi

एवढी जरी गर्दी तेथे जमली होती तरी लोक अत्यंत शिस्तीने अत्यंदर्शनासाठी उभे होते.
बाबांचा पार्थिव देह राह्गृहात आणल्यानंतर बौद्ध भिक्षूंनी धार्मिक विधी पार पाडला हा विधी अत्यंत साधा होता. नंतर बाबासाहेबांच्या पार्थिव देहावर पावित्र्यनिदर्शक अशी शुभ्र वस्त्रे चढविण्यात आली पार्थिव देहाजवळ असंख्य मेणबत्त्या लावण्यात आल्या होत्या. त्यांच्या उशाला बुद्धांची एक मूर्ती होती. दुपारी एक वाजेपर्यंत सुमारे दोन लक्ष ( लाख ) लोकांनी अंत्यदर्शन घेतले . बाबासाहेबांच्या दुःखद निधनामुळे सुमारे दोन लक्ष कामगारांनी हरताळ पाळला. त्यामुळे पंचवीस कापड गिरण्या पूर्णपणे बंद होत्या. अनेकांनी आपली दुकाने बंद केली होती. शाळा कॉलेजमधील विद्यार्थ्यांनी देखील हरताळात भाग घेतला होता.
एका शृंगाररलेल्या ट्रकवर बाबासाहेबांचा पार्थिव देह ठेवण्यात आला .त्या मागे बुद्धांची मूर्ती ठेवण्यात आली होती. त्यांच्याशेजारीच पुत्र यशवंतराव (उर्फ भय्यासाहेब आंबेडकर ) व पुतणे मुकुंदराव बसले होते. मिरवणुकीची लांबी सुमारे दीड ते दोन मैल होती. किमान दहा लाख लोकांनी भारताच्या या बंडखोर सुपुत्राचे अंतिम दर्शन घेण्यासाठी मार्गावर दुतर्फा गर्दी केली होती. एवढी मोठी प्रचंड गर्दी ! पण बेशिस्त वर्तनाचा एकही प्रकार कुठेही घडला नाही. अशाप्रकारे डॉ. बाबासाहेबांची अंत्ययात्रा निघाली परळ नाक्यापासून मिरवणूक एल्फिन्स्टनरोडकडे निघाली तेव्हा जिकडे तिकडे माणसांशिवाय दुसरे काहीच दिसत नव्हते.बरोबर दिनांक ७ डिसेंबर ५ वाजता महायात्रा दादरच्या चौपाटीवर आली. डॉ. बाबासाहेबांच्या शवाला अग्नी देण्यासाठी भागेश्वर स्मशानभूमीतच समुद्राच्या बाजूच्या भिंतीलगत एक वाळूचा प्रचंड चौथरा तयार करण्यात आला होता . बाबांचे शव ट्रकच्या खाली उतरविण्यात आले मेणबत्यांचे तबके घेतलेले चार भिक्षु पुढ होते. बाबासाहेबांचे शव सर्वांना दिसेल अशाप्रकारे एका उंच व्यासपीठावर ठेवण्यात आले. मुंबई सरकारतर्फे बाबासाहेबांच्या पार्थिव देहाला पुष्पहार अर्पण करण्यात आला. मुंबईतील व बाहेरगावची अनेक प्रमुख मंडळी उपस्थित होती. भिक्षूंनी धार्मिक विधीस प्रारंभ केला ते करूण दृश्य पाहतांना अनेकांच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. त्यांचा हा विधी आनंद कौसल्यायन यांच्या मार्गदर्शनाखाली झाला .यानंतर बाबासाहेबांचे शव चंदनाच्या चितेवर चढविले आणि डॉ. बाबासाहेबांच्या पार्थिव शवाला सशत्र पोलीस दलाने त्रिसर बंदुकीने बार काढून मानवंदना दिली व बिगुलाच्या गंभीर स्वरात त्यांच्या देहाला पुत्र यशवंतराव यांच्या हस्ते संध्याकाळी ७-१५ वाजता अग्नी देण्यात आला बाबासाहेबांच्या शवाला अग्नी देताच यांचे आप्तस्वकीय यांना संयम आवरता आला नाही ते चीतेकडे धावले ओक्साबोक्शी रडू लागले . व त्यांनी पुन्हा ' बाबांचे ' शेवटचे दर्शन घेतले. आणि काही क्षणात बाबासाहेबांचा पार्थिव देह कायमचा अनंतात विलीन झाला.
रविवार दिनांक ९ ला सकाळी ८ वाजता दादर चौपाटीवर विस्तीर्ण वाळूच्या पटांगणात जाहीर शोकसभा झाली अध्यक्ष भदंत कौसल्यायन हे होते. आणि अनेक वक्ते उपस्थितीत होते. अनेकांची भाषणे झाली श्रीमती रेणू चक्रवर्ती यांनी भाषणात हे उद्गार काढले ' आम्हा तरुण सभासदांना डॉ. आंबेडकर यांच्या सान्निध्यात राहण्याचा अगर त्यांच्यबरोबर काम करण्याचा सुयोग मिळाला नाही. डॉ. आंबेडकर यांनी राज्यघटना व हिंदू कायद्याची संहिता जी मुळ तयार केली होती , ती उकृष्ट होती. आणि जोपर्यंत या दोन कृती भारतात अस्तीत्वात राहतील तोपर्यंत आंबेडकरांच्या अद्वितीय बुद्धीमत्तेचा व कर्तुत्वाचा स्मृतीदीप भारतात तेवत राहील .हिंदू समाजातील पिडीत व दलित लोकांना त्यांनी ज्ञानाची संजीवनी पाजून जिवंत केले आणि आपल्या मानवी हक्कांसाठी लढण्यास उभे केले. त्याचप्रमाणे त्यांनी पददलितांबद्दलची वरिष्ठ वर्गाची दृष्टी बदलून टाकली हे त्यांचे अनुपम थोर राष्ट्रकार्य होय.
त्यानंतर आचार्य अत्रे यांनी सुद्धा भाषण केले ते म्हणाले या महान नेत्याच्या मृत्युच्या मृत्यूने मृत्यूचीच कीव वाटू लागली आहे. मरणानेच आज आपले हसू करून घेतले आहे .मृत्यूला काय दुसरी माणसे दिसली नाहीत ? मग त्याने इतिहास निर्माण करण्याऱ्या एका महान जीवनाच्या या ग्रंथावर , इतिहासाच्या एका पर्वावरच का झडप घातली ? भारताला महापुरुषांची वाण कधी पडली नाही . परंतु असा युगपुरुष शतकाशतकात तरी होणार नाही. झंझावाताला मागे सारणारा ,महासागराच्या लाटांसारखा त्यांचा अवखळ स्वभाव होता. जन्मभर त्यांनी बंड केले. आंबेडकर म्हणजे बंड असा बंडखोर शूरवीर , बहाद्दर पुरुष आज मृत्युच्या चिरनिद्रेच्या मांडीवर कायमचा विसावा घेत आहे.त्यांचे वर्णन करण्यास शब्द नाहीत.
महामानवास माझे त्रिवार अभिवादन .... व कोटी कोटी प्रणाम......
! जयभीम ! !! नमो बुद्धाय !! !!! जय भारत

Shivaji park chaytya bhumi 2016

आज पहाटे  चैत्यभूमी आणि शिवाजी पार्क परिसरात फिरत असताना एक प्रश्न सारखा सतावत होता?
का ही माणसे येतात?
काय मिळतं इथे येऊन?
नीट राहायला मिळत नाही...
धड झोपायला मिळत नाही...
खायला मिळत नाही...
मग इतकी चैत्यभूमीची ओढ का आहे?
लहान बालकं, तरुण मुले-मुली, सफेद वस्त्र परिधान केलेल्या स्त्रिया, म्हातारी माणसं...
झोपायला जागा नाही तरीही तशीच अस्ताव्यस्त पडलेली...
अंथरुण नाही अन पांघरुणही नाही...
कडाक्याची थंडी...
शौचालयाची अपुरी व्यवस्था...
रात्रभर जागून सांगणारे
पुस्तके, फोटो, मुर्त्या, कॅलेंडर यांचे स्टॉल...
१२५ व्या जयंती निमित्त १,२५,००० लोकांचा रक्तदान करण्याचा संकल्प करणारे महाराष्ट्रासह देशभरातून आलेले अनुयायी...
हाता-गळ्यातल्या धाग्यासह खिशातून तंबाखूच्या पुड्या काढणारे २२ प्रतिज्ञा अभियानचे प्रतिनिधी...
पथनाट्यातून लोकांना एकत्र येण्यासाठी सांगणारे तरुण मंडळी...
कोणत्याही पक्षात रहा पण वेळ आल्यावर नेत्याच्या आदेशाची वाट न पाहता समाजासाठी एकत्र या हे ओरडून सांगणारा FAM चा कार्यकर्ता...

काय मिळतं या सर्वांना?

माहित नाही...

मग मी स्वतःलाच प्रश्न केला?
काय मिळतं इथे येऊन?

उत्तर मिळालं...
काय मिळतं म्हणून येत नाही, तर आयुष्यात जे जे मिळालं ते ज्या महामानवामुळे मिळालं त्याला अभिवादन करण्यासाठी येतो...

इतक्या लाखों लोकांमध्ये भीक मागणारी एकही व्यक्ती भेटली नाही... स्वाभिमानी माणसं निर्माण करणारा युगपुरुष जगात दुसरा कुणी झाला नाही अन होणारही नाही... करोडों गोरगरीब जनता असलेला जगातील सर्वात श्रीमंत आपला बाप आजही आपली श्रीमंती टिकवून आहे...

बाबा तुमचे ऋण आम्ही फेडू शकत नाही पण तुम्हाला अभिप्रेत असलेला भारत घडविण्यासाठी मी कटिबद्ध आहे, हि जाणीव सदैव स्मरणात रहावी...
..

आपला भिम सैनिक...बाबासाहेब आकाडे

Shivajipark mumbai 2016 condition in marathi

स्वच्छता मनातली अन्‌ शिवाजी पार्कची!

द्वारकानाथ संझगिरी

7 डिसेंबर 2015
 
आम्हा शिवाजी पार्कवासीयांना शिवाजी पार्कचं मैदान आणि आसपासचा भाग नेहमी परिटघडीचा लागतो. आणि त्याची अपेक्षा का ठेवू नये ? आमचा तो हक्क आहेच. ही परिटघडी जेव्हा एखादी मोठी राजकीय सभा असते तेव्हा विस्कटते. शिवाजी पार्क जिमखान्याच्या टेनिस कोर्टाच्या कुंपणाचा किंवा तिच्या पलीकडे स्काऊट हॉलच्या पलीकडच्या भागाचा उपयोग अशा वेळी बर्याटच वेळा सार्वजनिक मुतारीसाठी केला जातो. त्या वेळी किंवा त्या सभेच्या दुसर्याा दिवशी फिरताना, येणार्या् दुर्गंधीमुळे एखादा निषेधाचा सूर उमटतो. नाही असं नाही, पण तो तसा क्षीण असतो. पण ६ डिसेंबरला शिवाजी पार्कवर जो जनसागर उसळतो, त्या वेळी रोज शिवाजी पार्कला फिरणारी माणसं अदृश्य होतात. चार तारखेला अदृश्य झालेली माणसं आठ तारखेला पुन्हा उगवतात. त्याच्या आसपास जी शब्दफुलं उधळली जातात ती साधारण अशी असतात- ‘‘उद्यापासून पार्कात यायला नको,‘‘ ‘‘उकिरडा बरा रे, अजून दोन दिवस तरी यायला नको होतं,‘‘ ‘‘सर्व हलवा नागपूरला.‘‘ या प्रतिक्रिया फक्त घाणीपुरत्या नसतात. लपलेला जातीयद्वेष त्यातून डोकवायला लागतो. आपल्या देशात कुठेही लाखो लोक जमतात, तेव्हा घाण होतेच. पंढरपुरात लाखो वारकरी जमतात तेव्हा काय तिथे स्वच्छता नांदते ? कुंभमेळ्याच्या वेळी नाशकात काय झालं होतं? साध्या क्रिकेट मॅचच्या वेळी स्टेडियममध्ये मुतारीत शिरवत नाही. मला आठवतंय, संस्कारक्षम वयात मी सांगलीला गेलो होतो. त्या काळी टोपलीचे संडास होते. शौचाला बसत असताना मला जाणवलं की खालून कुणीतरी टोपली काढतंय आणि नवी टोपली ठेवतंय. मी खिडकीतून बाहेर पाहिलं. एक काळा कृश माणूस ती मैल्याची टोपली डोक्यावरून घेऊन चालला होता. माझ्या अंगावर सरसरून काटा आला. त्यातली घाण त्याच्या अंगावर पडत होती.

समाजातल्या काहींनी पिढ्यानि्‌पिढ्या डोक्यावरून मैला वाहिला. आम्हाला मैलावरचा मैला एक दिवसही सहन होत नाही. सेल्फकंटेन्ड ब्लॉकमध्ये राहणार्याव शहरी पिढीने हे वर्णन फक्त पुस्तकात वाचलेलं असतं. तेसुद्धा १०-२० मार्कांसाठी. वाचलेलं मेंदूतून पेपरात झिरपतं. मनात कधीच उतरत नाही. त्यामुळे मनू आम्हा शहरी मंडळीच्या मनातून गेलेला नसतो. मीसुद्धा रोज शिवाजी पार्कला फिरायला जातो. मलाही शिवाजी पार्क परिटघडीचं असणं आवडतं. पण आम्हाला दोन-तीन दिवस शिवाजी पार्क बाबासाहेबांच्या अनुयायांना मनापासून देता येत नाही ? तुमचं मन तेव्हढं तरी मोठं असू द्यात.
बरं, अलीकडे शिवाजी पार्कची विस्कटलेली परिटघडी फार चटकन व्यवस्थित होते. त्यासाठी मला वाटतं की, मुंबई महानगरपालिकेच्या कर्मचार्यांडचं कौतुक करायलाच हवं. मुंबई महानगरपालिका, पालिकेचे कर्मचारी, इंजिनीअर्स हे बर्याचचवेळा लोकांच्या आणि मीडियाच्या दृष्टीने टीकेचा विषय असतात. चॅनेलवाले तर गेल्या २६ जुलैनंतर जरा मोठा पाऊस पडून एखाद्या सखल भागी पाणी तुंबलं की, मुंबई महानगरपालिकेच्या नावाने शिमगा करतात. पाणी तुंबल्यानंतर इतर कारणांचा कुणी विचार करीतच नाही. मला असं वाटतं की, खून, बलात्कार, भ्रष्टाचार, क्रिकेटपटूंचं अपयश ही जशी बातमी होते तशी चांगलं काम हीसुद्धा बातमी होऊन ती हायलाईट करायला हवी.

गेल्या दोन दिवसांत शिवाजी पार्कची परीटघडी हाताबाहेर विस्कटली जाणार नाही यासाठी जी नॉर्थचे वॉर्ड अधिकारी अश्विन खानोलकर यांच्या टीमने जे काम केलंय त्याची वाखाणणी व्हायला हवी. या वेळच्या महापरिनिर्वाण दिवसाची गोष्ट तर निराळी होती. हे महापरिनिर्वाणाचं पन्नासावं वर्ष! नेहमी चैत्यभूमीवर दर्शनासाठी पाच लाख भक्त येतात. या वेळी १० ते २० लाखांची अपेक्षा होती. त्यात खैरलांजी प्रकरण, मग ते कानपूर प्रकरण, त्यामुळे चिडलेली, पेटलेली मनं. पण अश्विन खानोलकरांनी विशेष प्लॅनिंग करून सर्व सुखसोयी पुरवल्या. शिवाजी पार्क हे जवळजवळ ७० हजार स्क्वेअर मीटर्सचे आहे. त्यात तिथे राहायला येणार्याा साधारण ७०-८० हजारांच्या फ्लोटिंग पॉप्युलेशनसाठी २१ हजार स्क्वेअर मीटर्सची जागा तंबू ठोकून उपलब्ध करून दिली. त्या मंडळींचं खाणं-पिणं, पुस्तक, कॅसेटची विक्री, मेडिकल सुविधा वगैरेंसाठी तब्बल ४५० स्टॉल्स उभारले गेले. डॉ. आंबेडकरांच्या अनुयायांमध्ये अनेक गट आहेत. त्या विविध गटांना मीटिंगसाठी, चर्चेसाठी वगैरे चार वेगवेगळे मंडप घालून मीटिंगच्या जागेची सोय केली गेली. शिवाजी पार्कवर कुठलीही मीटिंग, कार्यक्रम वगैरे असला की क्रिकेटच्या पिचचं नुकसान होतं. ते टाळण्यासाठी सातच्या सात खेळपट्ट्या या पॉलिथिनच्या कव्हर्सनी झाकण्यात आल्या.सर्वात महत्त्वाचा भाग असतो हा दुर्गंधीचा- घाणीचा- धुळीचा! धूळ उडू नये म्हणून तंबू आणि स्टॉल्समध्ये कार्पेटस्‌ टाकली गेली आणि जिथे मोकळी जागा आहे तिथे तर तीन-चार तासांनी पाणी मारून धूळ उडणार नाही हे पाहिलं गेलं. या वेळी वाढत्या गर्दीचा अंदाज घेऊन पाण्याचे ३०० नळ पुरविण्यात आले. त्या सांडपाण्याचा निचरा करण्यासाठी सिस्टीम उभारली गेली. तब्बल एकशेवीस मोबाईल शौचालये उभारून, त्या सांडपाण्याचा निचरा हा ड्रेनेजच्या तात्पुरत्या पीव्हीसी पाइपातून सीवेजच्या ड्रेनेजमध्ये करण्यात आला. तिथे येणारी मंडळी ही तशी आपल्या समाजाने गावकुसाबाहेर भिरकावलेली गरीब मंडळी असतात. त्यांना हॉटेलात जेवण परवडत नाही. एक तर मोफत अन्नदानाच्या स्टॉलवर रांग लावायची किंवा जेवण तयार करायचं. उरलेल्या अन्नामुळे जास्त दुर्गंधी येते. ती टाळण्यासाठी शिवाजी पार्कचे नऊ विभाग पाडण्यात आले. त्या प्रत्येक विभागासाठी एक ज्युनियर ओव्हरसियर. त्याच्या हाताखाली सुपरव्हायजरी स्टाफ आणि पंचवीस मजूर देण्यात आले. त्यांचं काम ? चार तारखेपासून सात तारखेपर्यंत राऊंड द्‌ क्लॉक स्वच्छता ठेवणे. त्यांना वेगळ्या रंगाचे कपडे आणि जॅकेटस्‌ देण्यात आले. आमचं शिवाजी पार्क परिटघडीचं ठेवण्यासाठी केलेला हा भगीरथ प्रयत्न आहे. त्यासाठी साधारण एक कोटी रुपये खर्च होतील.

सात तारखेपासून सकाळी स्टॉल्स, नळ-संडास वगैरे हलवायला सुरुवात होईल. सात सारखेला संध्याकाळी शिवाजी पार्क पूर्ववत करण्याचा प्रयत्न होईल. क्षणात शिवाजी पार्क स्वच्छ होऊ शकत नाही. तशी जादूची कांडी आज विज्ञानाकडेही नाही. कुठेतरी, काहीतरी दुर्गंधी राहीलही, पण प्रयत्न महत्त्वाचा आहे. पुन्हा आम्ही मंडळी सकाळ-संध्याकाळ शिवाजी पार्कला आमच्या कॅलरिज कमी करीत फेर्याआ मारू. माझं एवढंच म्हणणं आहे की, त्या फेर्या  मारताना आमच्या मनात कुठंही दुर्गंधी नसावी. कारण शिवाजी पार्कच्या गवतावरची दुर्गंधी काढून टाकता येते. माणसाच्या मनातली दुर्गंधी काढण्यासाठी महापुरुष जन्माला यावा लागतो. महाराष्ट्रात अनेक महापुरुष जन्माला आले, पण आमची मनं अजून हवी तेवढी स्वच्छ झालेली नाहीत ती ज्या दिवशी होतील तेव्हाच शिवाजी पार्कवरच्या गवताच्या दुर्गंधीचा वास आम्हाला येणार नाही.

Power & Position story

"POWER आणि POSITION" यात फरक आहे असे बाबासाहेब म्हणत. ब्राह्मणांनी आमच्या लोकांना POSITION दिली , POWER  दिलीच नाही आणि आपले लोक POSITION ला, POWER म्हणू लागले, समजू लागले.  हा एक भ्रम आहे आणि भ्रम एक मानसिक आजार आहे.
   POSITION म्हणजे पद. ते तुम्हाला आमदार करतील, खासदार करतील, मंत्री करतील, उपमुख्यमंत्री करतील, मुख्यमंत्री करतील परंतु निर्णय घेण्याचा अधिकार देणार नाहीत.  तो HIGH COMMAND कडेच राहील. मंत्रीपद, लाल दिव्याची गाडी, दरवाजा उघडायला ड्रायव्हर, बंगला, नोकर-चाकर......याला POSITION म्हणतात POWER नव्हे. आमच्या लोकांना त्यांनी POSITION दिली, पण POWER दिलीच नाही.
आज देखील 85% बहुजन समाजातील आमदार-खासदारांना दिल्लीला जाऊन पुढे झुकावे लागते, वाकून मुजरा करावा लागतो.
जसे शेतकरी शेतात बुजगावणे उभे करतो, ते कशासाठी ? पक्षांना घाबरविण्यासाठी. पक्षांना वाटते, हा शेतकरीच आहे,  परंतु ते असते बुजगावणे.  तसे महाराष्ट्रातील व देशातील जनतेला वाटते, हा मुख्यमंत्री आहे, परंतु ते असते बुजगावणे. जसे विलासराव, अशोक राव, नारायणराव. ...इत्यादी. ..हे सगळेच राव, कारण सत्ता ब्राह्मणांची आहे आणि त्यांनी 85% बहुजन समाजातील आमदार खासदारांना POSITION  दिली, POWER दिलीच नाही.

हा सर्व पुणे कराराचा परिणाम आहे. त्यामुळे काय होते ?

महाराष्ट्रात डरकाळ्या फोडणारे-दिल्लीत विनवण्या कराव्या लागतात.

महाराष्ट्रात गुरगुरणार्याना -दिल्लीत म्याॅव म्याॅव करण्याचाही अधिकार नाही.

जे बंडाची भाषा करतात ते दिल्लीत थंड होतात.

जे आक्रस्ताळेपणा करतात त्यांना दिल्लीत शांत बसावे लागते, तडजोड करावी लागते.

महाराष्ट्रात जे संघर्षांची भाषा करतात त्यांना दिल्लीत शरणागती पत्करावी लागते. कारण दिल्लीची सत्ता ब्राह्मणी पक्षांच्या ब्राह्मणांच्या हाती आहे. दिल्लीची सत्ता     कुठल्याही बहुजन पक्ष्याच्या हाती नाही.

जे महाराष्ट्रात वाघ सिंह असतात ते दिल्लीत शेळ्यामेंढया बनतात.

महाराष्ट्रात एकमेकांच्या नरडीचा घोट घेणारे दिल्लीत गेल्यावर गळाभेट करून माघारी येतात.

आताच्या बहुजन पक्ष्यांच्या मुख्य पदावर ब्राह्मणांनी प्रवेश केल्यामुळे हे बहुजन पक्ष निष्प्रभ ठरले आहेत.
याची समिक्षा सामान्य माणूस करू शकला नाही, निरिक्षण करू शकला नाही. एक दुर्भाग्य.....

आपल्या बर्‍याच लोकांना - PRIME MINISTER या इंग्रजी शब्दाचे साधे भाषांतर सुध्दा करता येत नाही.    -PRIME म्हणजे प्रधान, MINISTER
म्हणजे मंत्री. अर्थात PRIME MINISTER   या शब्दाचे भाषांतर आहे -प्रधानमंत्री. आणि आपले लोक, कार्यकर्ते, नेते, मंत्री, प्रचार-प्रसार माध्यमे PRIME MINISTER  या शब्दाचे भाषांतर "पंतप्रधान"असे करतात. कारण पंतच ( ब्राह्मण ) प्रधान हवा असतो.

भारतीय संविधानातील पहिलेच कलम आहे- India that is BHARAT घटनाकारांनी 395 कलमांपैकी -पहिल्या व एकमेव कलमाचे मराठीत भाषांतर करून दिले आहे. काय मराठीत भाषांतर केले आहे ? India that is BHARAT   म्हणजे संविधानाच्या पहिल्या कलमाने देशाचे नाव निश्चित केले आहे - भारत.
बाबासाहेबांनी असे का केले?
कारण बाबासाहेबांना माहीत होते की माझ्यानंतर हे चलाख य ब्राह्मण INDIAचे भाषांतर हिंदुस्थान करतील.असे करू नये म्हणून बाबासाहेबांनी INDIA THAT IS BHARAT असे भाषांतर जाणीव पूर्वक करून ठेवले आहे.

संदर्भ :- मराठा, ओबीसी, कुणबी.
आरक्षणाचा तिढा (समस्या) राष्ट्रव्यापी आंदोलनाशिवाय सुटणार नाही.

✊आमचा संघर्ष सत्ता आणि संपत्तीसाठी नसून संपूर्ण स्वातंत्र्यासाठी आहे.✊

Dr B R Ambedkar

**** पोस्ट नः 100 *****
    बुध्द आणि त्यांचा धम्म
    दुसरा खंडः भाग तिसरा  

३) सारीपुत्त आणि मोग्गलान यांची धम्मदीक्षा
*******************
1) तथागत राजगृहात राहत असताना तेथे संजय नावाचा एक प्रसिद्ध मनुष्य तेथे राहत होता सुमारे अडीचशे परिव्राजक त्याचे शिष्य म्हणून त्याच्याबरोबर राहत होते
2) त्याच्या या शिष्यावर्गात सारीपुत्त आणि मोग्गलान या नावाने दोन तरुण  ब्राम्हण होते .
3) संजयच्या उपदेशाने सारीपुत्त आणि मोग्गलान यांचे समाधान झाले नव्हते आणि ते यापेक्षा चांगल्या तत्वज्ञानाच्या शोधात होते
4) एके दिवशी सकाळी पंचवर्गीय भिक्खुपैंकी  स्थविर अश्वजित आपले चीवर परिधान करुन आणि भिक्षापात्र व दुसरे चीवर हाती घेऊन राजगृह नगरात भिक्षेसाठी आला
5) अश्वजितची धीर गंभीर चालचलणुक पाहुन सारीपुत्त चकित झाला वंदनीय अश्वजितास पाहिल्यावर सारीपुत्त स्वतःशीच विचार करु लागला खरोखर हा पुरुष  म्हणजे जगातील महान योग्यतेचा भिक्खु आहे जर मी या भिक्खुकडे गेलो आणि मित्रा तु कुणामुळे है वैराग्य प्राप्त करुन घेतलेस ? तुझा गुरु कोण? तु कोणता धम्म मानतोस ? आसे मी जर त्याला विचारले तर काय हरकत आहे
6) परंतु मग सारीपुत्त मनाशी म्हणाला ह्या भिक्खुला हे विचारण्याची ही वेळ नव्हे तो भिक्षेसाठी एका घराच्या आतल्या आवारात शिरला आहे याचकांना उचित अशा पध्दतीने मी जर यांच्या मागोमाग गेलो तर काय हरकत आहे
7) आणि राजगृहातील आपली भिक्षायात्रा संपविल्यानंतर वंदनीय अश्वजित मिळालेले अन्न घेऊन परत फिरलो नंतर ते ज्या ठिकाणी होते त्या ठिकाणी सारीपुत्त गेला त्यांच्यासमोर जाऊन त्यांनी त्याला अभिवादन केले आणि अदबीने त्यांच्याशी बोलून तो त्यांच्या जवळ उभा राहिला
8) अश्वजितच्या जवळ उभा राहुन परिव्राजक सारीपुत्ताने त्याला विचारले मित्रा आपली मुद्रा शांत आहे आपले रुप शुध्द आणि तेजस्वी आहे आपण कोणामुळे हे वैराग्य धारण केले आहे आपला गुरु कोण आपण कोणता धम्म मानता
9) अश्वजित म्हणाला मित्रा शाक्यकुळात जन्मलेला एक महान श्रमन आहे त्याच्याच नावाने मी ही परिव्राज्या धारण केली आहे तोच माझा गुरु आहे आणि त्याच्यांत धम्मालाषमी अनुसरले आहे
10) वंदणीय महाराज आपल्या गुरुचा कोणता सिध्दांत आहे आणि त्यांनी आपणाला कोणता उपदेश दिला आहे
11) मित्रा मी एक तरुण शिष्य आहे मी नुकतीच  दिक्षा घेतली आहे आणि त्यांचा धम्म आणि त्यांची शिष्यत्व मी नव्यानेच पत्करले आहे मी तुला धम्माची तपशीलवार माहीती देऊ शकणार नाही पण त्याचा अर्थ काय हे मी तुला थोडक्यात सांगेन

क्रमशः
रोज वाचा
" बुध्द आणि त्यांचा धम्म  "

" समतेच्या विचारांच्या प्रत्येक व्यक्तीने प्रत्येक रविवारी बुध्द  विहारात सकाळी  गेलेच पाहिजे "

भावनेच्या भरात कोणता ही निर्णय घेऊ नये .

बाबासाहेबांचा उल्लेख नेहमी
" विश्वरत्न बाबासाहेब " असाच करावा

काळजीपुर्वक वाचा आणि विचार करा आणि पुढे फाँरवर्ड करा
**********************************
विश्वरत्न डाँ.बाबासाहेब आंबेडकर
[M.A.,P.HD.,D.sc.,L.L.D.,D.LITT.,BARRISTER -AT-LAW ]
*********************************

Life of inspiration ....

एकदा एक संत देवाबरोबर बोलत होता.

त्याने देवाला स्वर्ग आणि नरक मधला फरक विचारला.

“ये तुला प्रत्यक्ष दाखवतो.”
देव म्हणाला.

त्याने संताला दोन दरवाजांजवळ नेलं.

त्याने पहिला दरवाजा ढकलला.एका मोठ्या खोलीत प्रवेश केला.

एका मोठ्या गोल टेबलाभोवती अनेक माणसे बसली होती.

टेबलाच्या मध्यावर रुचकर खिरीने भरलेले मोठे भांडे ठेवलेलं होतं.

त्या खिरीच्या सुगंधाने त्या संत माणसाच्या तोंडाला देखील पाणी सुटलं होतं.

पण मग त्याच्या लक्षात आलं की ती माणसे उपाशी भुकेलेली दिसत होती.
त्यांच्या हाताला लांब दांड्यांचे चमचे बांधलेले होते.

त्यांना हात लांब करून खीर खाता येत नव्हती.

कारण चमच्याचा दांडा हातापेक्षा लांब होता

त्यांच्या यातनांना अंत नव्हता.

भुकेच्या भरीला खिरीच्या सुवासाने त्यांना वेड लावले होते.

“हा नरक आहे...”देव म्हणाला.

“चल आता स्वर्ग पाहू.

”ते दुस-या दारातून आत आले.

ती खोली सुद्धा हुबेहूब पहिल्या खोली सारखीच होती.

तेच टेबल तेच खिरीचं भांडं.

भोवताली माणसं आणि हाताला बांधलेले चमचे.

पण ही सगळी माणसे तृप्त
समाधानी व आनंदी दिसत होती.

आपापसात हसत आनंदाने राहत होती.

“मला कळत नाहीये”
संत म्हणाला,”सारख्याच खोल्या,टेबल,भांडी,खीर आणि तेच लांब दांड्यांचे चमचे,मग ही माणसे खाऊन तृप्त आणि ती उपाशी आणि दु:खी का??

“सोपं आहे...”देव म्हणाला
“या खोलीतील माणसे एकमेकांना भरवायला शिकली आहेत.

हावरट मनुष्य फक्त स्वत:चा विचार करतो”

गोष्ट संपली.........

जेव्हा तुम्ही दुस-याला त्यांची इच्छा पूर्ण करायला मदत कराल तेव्हा आपोआपच तुमची स्वप्ने सुद्धा पूर्ण होतील

स्वत:च्या गरजांपेक्षा इतरांच्या इच्छा व आवश्यकतांना अधिक मान किंवा प्राधान्यक्रम देणे हे समूह यशाचे गुपित आहे.

यात आनंदाची बातमी अशी की हा स्वर्ग किंवा नरक निर्माण करणे आपल्याच हातात असते.

खोली,खीर,टेबल आणि चमचा..

सगळ्यांना समान संधी मिळते.
सर्वांना मदत करा.

मग बघा आपल्या जीवनातील अंतर रंग कसे खुलतात ते.....����