Wednesday, 23 March 2016

सोशल नेटवर्किंगचं विदारक सत्य 

नवी दिल्ली : तो त्यावेळी जीवन आणि मृत्यूतली लढाई लढत होता, आणि सोशल नेटवर्किंगवर त्याला शिव्यांची लाखोली वाहिली जात होती. हो त्याच्या डोळ्यासमोर अंधार येत होता, त्याला चक्कर येत होती, एसी मेट्रोत त्याला घाम येत होता, खाकीतला तो रक्षक पोलीस अस्वस्थ होता. तो खाली कोसळला, कारण त्याला ब्रेम हॅमरेज झाले होते.

तो आयुष्यात दारूच्या आहारी नव्हत

मात्र मेट्रोतील काही प्रवाशी त्याचा व्हिडीओ काढत होते, कारण त्यांना तो दारू पिलेला पोलीस वाटत होता. हा व्हिडीओ काहीही विचार करता सोशल नेटवर्किंगवर अपलोड झाला, व्हॉटसअॅप ते फेसबुक सर्व ठिकाणी या पोलिसाला शिव्या दिल्या जात होत्या, असे पोलीस असले तर देशाचं काय होईल, वैगरे वैगरे....

एका व्हिडीओने नोकरी गेल

यानंतर या व्हिडीओवरून सलीम पीके यांची नोकरी गेली, त्यांना सेवेतून बडतर्फ करण्यात आलं, पण या झटक्यात त्यांची डावी बाजू निकामी झाली, पॅरेलीसीसच्या झटक्याने तोंडही निकामी झालं. बोलता येत नव्हतं, काय झालं कुणी समजून घेत नव्हतं.

जो बुंद से गई ...

सोशल नेटवर्किंगवर आलेली कोणतीही पोस्ट पुढे मित्रांना फॉवर्ड करताना विचार करा, असंच या व्हिडीओतून दिसून येतं. सोशल नेटवर्किंगचा एका पोलीस हवालदाराला मोठा फटका बसला आहे. खरंतर त्याचं हे नुकसान कधीही भरून काढता येण्यासारखं आहे.

भरपाईची मागण

या पोलीस हवालदाराने आता आपली प्रतिमा सोशल नेटवर्किंगवर खराब केल्याप्रकरणी भरपाईची मागणी केली आहे. ऑगस्ट २०१५ रोजी ही घटना घडली.

मूळगावी अंथरूणावर खिळू

दिल्ली पोलीस असलेले, सलीम हे हेड कॉन्स्टेबल आता आपल्या मूळगावी महिन्यापासून केरळात मेडिकल रजेवर आहेत. ब्लॉकेज असल्याने त्यांना ब्रेन हॅमरेज झाला.

मेट्रोत ब्रेम हॅमरेजचे झटक

जेव्हा मेट्रोत सलीम यांचा व्हिडीओ काढला जात होता, तेव्हाच त्यांना स्ट्रोक आले असावेत, त्यांच्या डोळ्यासमोर अंधारी येत होती, चक्कर येऊन ते पडले होते, हाच व्हिडीओ सोशल नेटवर्किंगवर व्हायरल झाला होता.

संयम ठेव

हाच व्हिडीओ पाहून त्यांना सेवेतून बडतर्फ करण्यात आलं होतं. त्यांना अखेर न्यायालयाने न्या दिला आहे, त्यांना सेवेत परत घेतलं आहे, पण त्यांचं हे नुकसान कसं भरून काढणार.... एकचं करा सोशल नेटवर्किंगवर काहीही आलं, तरी ते पुढे मित्रांना पाठवताना जरा संयम ठेवा.